Home Breaking News आणि…. हाफिज (टापू)चा भाजपला पाठिंबा

आणि…. हाफिज (टापू)चा भाजपला पाठिंबा

● प्रभागातील विकासासाठी घेतला निर्णय

20251224

प्रभागातील विकासासाठी घेतला निर्णय

Political News:
वणी नगरपरिषदेतील सत्तास्थापनेनंतर भाजपने राजकीय गणित अचूक जुळवत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष नगरसेवक अब्दुल हाफिज उर्फ टापू यांनी भाजपच्या पालिकेतील सत्तेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने नगरराजकारणात नवी चर्चा रंगली आहे. And…. Hafiz (Tapu) supports BJP

नगरपरिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने सत्ता स्थापणेकडे केलेली आगेकूच सकृतदर्शनी दिसत आहे. त्यातच अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यातही पक्षाने यश मिळवले आहे. अब्दुल हाफिज (टापू) यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ भक्कम झाले असून, आगामी काळात अन्य पक्षातील नवनिर्वाचित सदस्य सुद्धा गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपाध्यक्ष पदावर कोणाची लागणार वर्णी

“राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा” अशी भूमिका घेत अब्दुल हाफिज यांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दुसरा अपक्ष उमेदवारही विकासासाठी भाजपच्या दावणीला लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, प्रभागातील विकासकामांना गती मिळावी यासाठी सत्तेच्या बाजूने उभे राहणे गरजेचे असल्याची चर्चा पालिका राजकारणात सुरू झाली आहे.

Img 20250103 Wa0009

या घडामोडींमुळे विरोधकही प्रभागातील विकासकामांसाठी सत्तेच्या बाजूने झुकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत विकासकामांचा वेग वाढणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असून, अपक्ष व विरोधकांची पुढील भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच अपक्ष नगरसेवकाच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे भाजपची पालिकेतील सत्ता अधिक मजबूत होत असून, वणी नगरपरिषदेत येत्या काळात राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
Rokhthok

Previous articleघ्या…..झाली सुरवात विकासकामांची.!
Next articleउपाध्यक्ष पदावर कोणाची लागणार वर्णी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.