● जनता विद्यालयाचे घवघवीत यश
Wani News | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा 2025 मध्ये जनता विद्यालय, वणी यांचा निकाल अत्यंत गौरवास्पद लागला असून, एकूण 349 विद्यार्थ्यांपैकी 87.67% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 110 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, 144 जणांनी द्वितीय श्रेणीत, तर 52 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश संपादन केले आहे. तर अनुराधा, यश व ओम या तिघांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवण्याचा अभूतपूर्व विक्रम नोंदवला आहे. Anuradha, Yash and Om have set an unprecedented record of scoring 100 out of 100 marks in Sanskrit.
या यशस्वी निकालात अनुराधा अरविंद महालक्ष्मे हिने 98.20% गुण मिळवून वणी, झरी व मारेगाव या तीनही तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय, यश राजू कावडे (95.80%) व ओम संतोष पानघाटे (93.80%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शिवाणी निर्दोष ठेंगणे (91.80%), वैदही शंकर सोयाम (89.40%), स्वाती नानाजी वासेकर (89.40%), विद्या विनोद रहाटे (89.00%), साईप्रसाद हर्षवर्धन सूर (87.80%), आस्था सुनील गौरकर (86.40%), स्नेहल चंद्रशेखर पाचभाई (86.40%), मानसी विठ्ठल झाडे (85.80%) व सृष्टी वसंता थेटे (85.20%) यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.
या यशाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अशोक जीवतोडे, सचिव तथा विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष अंबरजी अशोक जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक व शाळेच्या मार्गदर्शनाला दिले आहे. मुख्याध्यापिका मंगला जोगी, उपमुख्याध्यापक गुलाब भोयर, पर्यवेक्षक उत्तम हांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. नेहमी प्रमाणे जनता विद्यालयाच्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली.
Rokhthok News