Home Breaking News बाजार समिती निवडणुकीत दणदणीत मतदान

बाजार समिती निवडणुकीत दणदणीत मतदान

● 94 टक्के मतदारांनी बजावला हक्क ● दोन्‍ही पॅनल मध्ये निकराची झुंज ● अवघ्या काही वेळातच निकाल

1258

94 टक्के मतदारांनी बजावला हक्क
दोन्‍ही पॅनल मध्ये निकराची झुंज
अवघ्या काही वेळातच निकाल

APMC election : रोखठोक | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या संचालक मंडळासाठी शुक्रवार दि. 28 एप्रीलला तालुक्‍यातील 4 बुथवर मतदान पार पडले. एक हजार 855 मतदारापैकी एक हजार 744 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. दोन्ही पॅनल मध्ये निकराची झुंज झाल्याचे दिसत असून अवघ्या काही वेळातच मतमोजणी ला सुरवात होणार आहे. Out of 1,855 voters, 1,744 voters exercised their right to vote.

Img 20250422 wa0027

बाजार समितीच्‍या 18 जागे करीता 38 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहे. भाजपा शिवसेना शिंदे गट युतीचे “शेतकरी एकता पॅनल” व महाविकास आघाडीचे “शेतकरी परिवर्तन पॅनल” हे दोन गट आपल्‍या उमेदवारांसह निवडणुक रिंगणात उतरले होते. तर दोन अपक्ष उमेदवार हमाल व तोलारी गटात नशिब अजमावत आहेत. तालुक्‍यातील 4 बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडली असुन शांततेत मतदान पार पडले.

Img 20250103 Wa0009

बाजार समितीच्‍या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघात 848 मतदारांपैकी 800, तर ग्राम पंचायत मधील 793 पैकी 733 मतदारांनी आपले कर्तव्य बजावले. व्यापारी व अडते गटात 125 पैकी 122 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर हमाल तोलारी गटातील 89 मतदारांनी शत प्रतिशत मतदान केले.

बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील चार बुथवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दणदणीत 94 टक्के मतदान झाले. अवघ्या काही कालावधीतच वसंत जिनिंगच्‍या सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणुन सुनील भालेराव व सहायक निवडणूक अधिकारी मनोज पिसाळकर व इतर कर्मचारी काम पहात आहे.
वणी: बातमीदार