Home Breaking News गायकवाड व बोंडे यांना अटक करा

गायकवाड व बोंडे यांना अटक करा

● अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध

C1 20240919 18453002

अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध

Political News | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बाबत आक्षेपार्ह तथा अपमानास्पद वक्तव्य करण्यात येत आहे. ही बाब निंदनीय तर आहेच शिवाय निषेधार्ह आहे. तालुका व शहर काँग्रेस कमिटीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देत आ. संजय गायकवाड व खा. अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात आली आहे. Arrest MLA Sanjay Gaikwad and MP Anil Bonde immediately.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे बाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंसक वक्तव्य केले. त्या प्रमाणेच खासदार अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली. सत्तेत असलेल्या या विकृत मनोवृत्ती विरुद्ध येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकते कमालीचे आक्रमक झाले आहे. त्या दोघांवर गुन्हे दाखल करून अटक करावी अशी एकमुखी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहर अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुळसंगे, राजू कासावार, टीकाराम कोंगरे, मोरेश्वर पावडे,ओम ठाकूर, अशोक पांडे, सुधीर खंडाळकर, रवी देठे, मंगल मडावी, सुरेश काकडे, विवेक मांडवकर, उपरे व कोरडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009