Home Breaking News Bachu Kadu : अन्नत्याग आंदोलन तीव्रतेकडे….!

Bachu Kadu : अन्नत्याग आंदोलन तीव्रतेकडे….!

● शासनाच्या उदासीनते विरोधात "प्रहार"

C1 20250612 07060396

शासनाच्या उदासीनते विरोधात “प्रहार”

Big News :
राज्याचे माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिनांक 8 जून पासून गुरुकुंज मोझरी येथे दिव्यांग, विधवा महिला पेन्शन दरवाढ, शेतकरी कर्जमाफी, कामगारांचे प्रश्न तसेच गोर-गरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या राज्यव्यापी आंदोलनाला झरी-जामणी तालुक्यातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. The statewide movement also received huge support from zari-Jamani talukas.

राज्याच्या राजकारणात नेहमीच थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आता तीव्रतेकडे झुकू लागले आहे. विविध मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त होऊन त्यांनी हे आंदोलन छेडले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या नेतृत्वात झरी जामनीचे तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत संबंधित मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे सागर इंगोले, संदीप तेलकापल्लीवार, अभिनव अक्कीनवार, सुनील बोधे, संभा परशिवे, गेडाम, रघुनाथ पवार, दिलीप देवांतवार हे उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या जनआंदोलनाने वेग घेतला असून, विविध जिल्ह्यांतून दिव्यांग, शेतकरी, महिला आणि गोरगरीबांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे की, “या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास माझा अन्नत्याग चालूच राहील आणि गरज पडल्यास आत्मक्लेशाचे टोक गाठावे लागेल.” असे स्पष्ट केले आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढू लागला आहे. आगामी काही तासांत सरकार काही ठोस निर्णय घेते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Rokhthok News