● जनावर आडवे आल्याने घडली घटना
Sad News | 30 वर्षीय तरुण दुचाकीने आपल्या वांजरी या गावी परतत असताना नांदेपेरा मार्गावर जनावर आडवे आले. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. डोक्याला जबर मार लागल्याने तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दिनांक 16 मार्चला सायंकाळी 7:30 वाजता घडली. The bike lost control and an accident occurred
राहुल सुरेश धांडे (30) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वांजरी येथील निवासी होता. वणीतील काम आटोपून सायंकाळी तो आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 CD 5247 ने गावी परत जात होता. नांदेपेरा मार्गावर त्याचे दुचाकी समोर जनावर आडवे आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी जनावरांवर धडकली.
या अपघातात त्याचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ शरद सुरेश धांडे याने पोलिसात तक्रार दाखल केली असून ग्रामीण रुग्णालयाच्या डेथ मेमो वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News






