Home Breaking News Breaking…|| नगर पंचायतीत काँग्रेस, शिवसेनेला कौल

Breaking…|| नगर पंचायतीत काँग्रेस, शिवसेनेला कौल

1266

● मनसे व जंगोम ने उघडले खाते

वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव व झरी-जामनी नगर पंचायतीत मतदारांनी काँग्रेस व शिवसेनेला कौल दिला. तर मनसेने दोन्ही ठिकाणी खाते उघडल्याने ग्रामीण भागातील जनता जनार्दनाने भाजपा उमेदवारांना नाकारल्याचे दिसत आहे.

Img 20250422 wa0027

वणी विधानसभा क्षेत्रातील मरेगाव व झरी या राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण असलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वगळता काँग्रेस, शिवसेना, भाजपा व मनसे ने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Img 20250103 Wa0009

मारेगावात व झरी येथे प्रत्येकी 17 जागासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ने आपला गड शाबूत ठेवत मारेगावात 5 तर झरीमध्ये 5 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर मागील वेळी मारेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते मात्र या निवडणुकीत त्यांना 4 जागेवर समाधान मानावे लागले तर झरीत 5 जागा पटकावल्या.

मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे, मात्र या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाल्याचे दिसत नसून मारेगावत अवघ्या 4 जागेवरच विजय मिळवता आला तर आमदारांचा बालेकिल्ला असलेल्या झरी मध्ये केवळ 1 एकच उमेदवार निवडून आला.

मागील पंचवार्षिक मध्ये या दोन्ही ठिकाणी मनसेचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यामुळे मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मतदारसंघात झंझावात निर्माण करत ग्रामीण भागात लक्ष्य केंद्रित केल्याने मरेगाव मध्ये 2 तर झरीत 1 असे तीन उमेदवार निवडून आणत खाते उघडले.

झरी जामनी नगर पंचायतीत पहिल्यांदाच राजकिय रिंगणात उतरत जंगोम पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून अनपेक्षित मुसंडी मारली. चार उमेदवार निवडून आणत आदिवासी बहुल भागात राजकिय मुत्सद्दीपणा दाखवून दिला. तर मारेगावात राष्ट्रवादी 1 तर झरी व मारेगावात प्रत्येकी 1 अपक्ष निवडून आला आहे
वणी: बातमीदार