● अपघाताच्या घटनेत कमालीची वाढ
Accident News : शहरातील लालगुडा चौफुलीवर एका 37 वर्षीय पादचारी तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दिनांक 13 जानेवारीला सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली. A 37-year-old pedestrian was crushed by a speeding vehicle on Lalguda Chauphuli.

मंगेश ऋषिकेश बोरीकर (37) असे दुर्दैवी मृतक तरुणाचे नाव आहे. तो घटनेच्या दिवशी लालगुडा MIDC कडून पायदळ आपल्या घराकडे जात होता. लालगुडा चौफुलीवर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने त्याला जबर धडक दिली. त्याचे अंगावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घडलेला अपघात भीषण होता, स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली तो पर्यंत ते वाहन पसार झाले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहचले, मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News