Home Breaking News Breaking : वनविभागातील लाचखोर सर्वेक्षक रंगेहात जाळ्यात अडकला

Breaking : वनविभागातील लाचखोर सर्वेक्षक रंगेहात जाळ्यात अडकला

● पंधरा हजाराची लाच स्वीकारताना जेरबंद

C1 20250911 07525230
Img 20250910 wa0005

पंधरा हजाराची लाच स्वीकारताना जेरबंद

YAVATMAL NEWS :
वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराचे आणखी एक दळभद्री उदाहरण उघड झाले आहे. वनसर्वेक्षक सुमित शंकरराव अक्कलवार (32) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्या चमूने 10 सप्टेंबरला थेट उपवनसंरक्षक कार्यालय, यवतमाळ येथील त्याच्या कक्षात पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. Bribery surveyor in the forest department caught red-handed

Img 20250103 Wa0009

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या शेतातील सागवान वृक्षतोडीकरिता सीमांकन व सर्वेक्षण अहवाल मिळवण्यासाठी अक्कलवार यांचेशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने प्रत्येकी दहा हजार रुपये दराने तीन शेतांसाठी एकूण तीस हजारांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तडजोड करून पंधरा हजार रुपये देण्याचे मान्य केले.

याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती येथे दाखल करण्यात आली होती. 9 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी झाल्यानंतर 10 सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यानुसार अक्कलवार यांनी पंधरा हजार रुपये स्वीकारताच रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अभय आष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही दणदणीत कारवाई केली. पथकात पोलिस निरीक्षक मनोज ओरके यांच्यासह जयंता ब्राह्मणकर, अतुल मते, अब्दुल वसीम, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, इफ्राज काझी आणि चालक संजय कांबळे यांचा सहभाग होता. आरोपी अक्कलवार यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ROKHTHOK