Home Breaking News निर्दयपणे जनावरांची तस्करी, एक अटकेत

निर्दयपणे जनावरांची तस्करी, एक अटकेत

● शिरपूर पोलिसांची कारवाई ● तीन बैलाची सुटका

C1 20231212 08472381

शिरपूर पोलिसांची कारवाई
तीन बैलाची सुटका

Wani News : शिरपूरचे ठाणेदार संजय राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कायर मार्गावरील पठारपूर फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पिकअप वाहनात निर्दयपणे जनावरांची तस्करी करणारा आढळून आला. त्याला ताब्यात घेत तीन बैलाची सुटका करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. On the basis of confidential information received by Shirpur Thanedar Sanjay Rathod, the police laid a trap near the Patharpur.

सोमवारी सायंकाळी प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पठारपूर फाट्याजवळ गस्त लावली. यावेळी संशयित बोलेरो पिक अप वाहन क्रमांक MH- 34-AV-0904 दिसून आले. वाहनांची झाडाझडती घेतली असता त्यात लोखंडी अँगलला निर्दयीपणे तीन बैल बांधून असल्याचे आढळले.

याप्रसंगी वाहन चालक शामराव नागोराव नंदुरकर (52) राहणार येन्सा तालुका वरोरा जि. चंद्रपुर यास ताब्यात घेत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. या कारवाईत तीन बैलाची सुटका करण्यात आली असून 4 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि संजय राठोड, गुणवंत पाटील, अनिल सुरपाम, प्रशांत झोड यांनी केली.
Rokhthok News