● शेतकरीहितार्थ आंदोलनात प्रशासनाची भूमिका संशयास्पद..!
Political News :
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे व शिव सैनिकांनी राज्याचे मंत्री अशोक उईके यांना शेतकरी हितार्थ जाब विचारला, ताफा अडवला म्हणून त्यांना अजामीनपात्र गुन्ह्यात अडकवण्यात आले. प्रशासनाची भूमिका शेतकरी विरोधी व संशयास्पद दिसून येत असल्याने शांत, संयमी विद्यमान आमदारांचे रौद्ररूप वणीकरांनी अनुभवले. खासदार संजय देशमुख व जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी हा वणवा संपूर्ण राज्यात पसरणार असल्याचे स्पष्ट केले. Calm, restrained MLAs turn violent, MPs get angry, farmers are angry, outbreak is certain..!
निसर्गाने चालवलेल्या क्रूर थट्टेत राज्यातील शेतकरी भरडल्या जातोय. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना केवळ शेतकाऱ्यांच्याच नशिबी आलाय. अतिवृष्टीने बळीराजा नेस्तनाबूत होत आहे. भविष्य टांगणीला लागल्याने आक्रोश वाढतोय. राज्य सरकार निव्वळ टोलवाटोलवी करत असल्याचा भ्रम निर्माण झाला आहे. या महत्वपूर्ण मुद्द्याला घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा एकमात्र राजकीय पक्ष शेतकरी हितार्थ आंदोलन करताहेत.
सोमवारी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांचा ताफा अडवून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. शेतकरी हितार्थ आंदोलन करणे शिवसैनिकांना चांगलेच महागात पडले. विद्यमान आमदार संजय देरकर शांत, संयमी आहेत मात्र त्यांचा मंगळवारी रौद्ररूप बघायला मिळाला. शेतकरी हितासाठी कुठलीही तडजोड नाही हे त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार संजय देशमुख यांनी हा वानवा संपूर्ण राज्यात पसरेल असा गर्भित इशारा दिला.
आंदोलक शिवसैनिकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या आंदोलकांवर यानंतर असेच गुन्हे दाखल होणार असल्याची चुणूक दिसून येत आहे. मटका, जुगार, अवैध व्यवसायाला अभय आणि शेतकरी हितार्थ आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई हे प्रशासनाला महागात पडेल असे वक्तव्य आमदार देरकर यांनी केल्याने भविष्यात शिवसैनिक विरुद्ध प्रशासन असा “सामना” रंगणार हे स्पष्ट झाले आहे.
Rokhthok






