● ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांविरोधात रोष…!
Political News | पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीकरीता प्रचार यंञणा तिव्र झाली आहे. कॉग्रेस पक्षाने नियोजनबध्द रणनिती आखल्याचे दिसत आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आणि मतदारांसोबत थेट भेट घेण्याचे धोरण राबविण्यात येत असुन काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा प्रचाराचा झंझावात वणी मतदारसंघात दिसून येत आहे. In the hustle and bustle of campaigning, face-to-face with voters.

कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे नेते संजय खाडे व सहकारी पायाला भिंगरी लावून प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात फिरताहेत. तालुक्यातील शेवाळा, येनक, शिवनी, बेलोरा, कैलाशनगर, चनाखा, परमडोह, कळमना, कुर्ली,रासा, सोनेगाव, दहेगाव, घोंसा या गावातील ग्रामस्थांच्या नुकत्याच भेटी गाठी घेवून मतदारांना संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
● सत्ताधाऱ्यांविरोधात मतदारांत संताप ●
महागाई, बेरोजगारी आणि संविधानाची रोज होणारी पायमल्ली याने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात संताप असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. यावेळी मतदारांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांचा भाजपविरोधात संताप असून यावेळी सर्वसामान्य मतदार भाजपला धडा शिकवणार असल्याचे मत कॉग्रेसचे नेते संजय खाडे यांनी व्यक्त केले आहे.
Rokhthok News