Home Breaking News Chandrapur – Arni Lok Sabha : बदलणारे समीकरण कोणाला तारणार

Chandrapur – Arni Lok Sabha : बदलणारे समीकरण कोणाला तारणार

● कॉग्रेसला सहानुभूती की भाजपाचा जनसंपर्क

कॉग्रेसला सहानुभूती की भाजपाचा जनसंपर्क

तुषार अतकारे : वणी
मागील लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाला राज्‍यात एकमेव ठिकाणी विजय मिळवुन देणाऱ्या चंद्रपुर-आर्णी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अल्‍पशा आजाराने खा. बाळु धानोरकर यांचे निधन झाले यामुळे कॉग्रेस पक्षाच्‍या पाठीशी सहानुभूती आहे तर भाजपाने जनसंपर्क वाढवलेला आहे. माञ वेळेवर बदलणारे समीकरण कोणाला तारणार याची उत्‍सुकता वाढली आहे. There is sympathy with the Congress party while the BJP has increased public relations.

मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपुर-आर्णी या एकमेव लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षाने बाजी मारली होती. दिवंगत खा. बाळु धानोरकरांनी केंद्रीय गृहराज्‍य मंञी हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. माञ अल्‍पशा आजाराने त्‍यांचे निधन झाले यामुळे कॉग्रेस पक्षाला तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.

जातीय समिकरणाला थारा न देणारा हा मतदारसंघ म्‍हणुन पुर्वी ओळखल्‍या जात होता. परंतु 2019 मध्‍ये दिवंगत खासदार धानोरकर यांनी झंझावात निर्माण केला होता. स्‍वतः खासदारकी तर मिळवलीच शिवाय पत्‍नी प्रतिभा बाळु धानोरकर यांना वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघातुन आमदार म्‍हणुन निवडुन आणले.

Img 20250103 Wa0009

चंद्रपुर – आर्णी लोकसभा मतदारसंघातील चंद्रपुर, बल्‍लारपुर, राजुरा, वरोरा – भद्रावती, वणी व आर्णी या विधानसभा मतदारसंघात भाजपा व कॉग्रेस पक्षाची ताकद जवळपास सारखीच आहे. सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ भाजपा कडे तर दोन मतदारसंघ कॉग्रेसकडे असुन एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे.

सहानुभूतीची लाटेवर स्‍वार होत कॉग्रेस पक्षाने विद्यमान आमदार प्रतिभा बाळु धानोरकर यांना लोकसभेच्‍या रिंगणात उतरवल्‍यास निवडणुक रंगतदार होणार आहे. तर कॉग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुध्‍दा लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी करीत असल्‍याचे दिसत आहे.

राजकीय पक्षांनी एकञीत येत “इंडिया” नामक आघाडी तयार केली आहे. यामुळे “एनडीए” ने सुध्‍दा राज्यात विरोधकांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीला लागली आहे, वरिष्‍ठ नेत्‍यांपासुन बुथ लेवलच्‍या कार्यकर्त्‍यांपर्यंत सर्वच झपाटल्‍यागत मतदारसंघ पिंजुन काढताहेत.

चंद्रपुर- आर्णी लोकसभेत भाजपा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्‍पष्‍ट नसले तरी माजी खासदार तथा केंद्रिय गृहराज्‍य मंञी हंसराज अहिर यांना संधी मिळेल असे दिसत आहे. तर राज्‍यातील बलाढय नेते सुधीर मुनगंटीवार हे सुध्‍दा पर्याय ठरतील. पक्षाने जातीय समिकरणाचा विचार केल्‍यास शिक्षण सम्राट अशोक जिवतोडे व व्‍यवसायीक रमेश राजुरकर हे सुध्‍दा लोकसभेतील संभाव्‍य उमेदवार असतील असे मत राजकीय विश्‍लेषक वर्तवतांना दिसत आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleशेकडो भगीनींनी उंबरकरांना बांधली “राखी”
Next articleआयशरला दुचाकी भिडली, तरुण गंभीर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.