Home Breaking News तरुणीची फसवणूक, बळजबरीने देहविक्री

तरुणीची फसवणूक, बळजबरीने देहविक्री

● सामाजिक संघटनेची तक्रार, पोलीसांची कारवाई

सामाजिक संघटनेची तक्रार, पोलीसांची कारवाई

prostitution news | राजस्‍थान मधुन कामानिमीत्‍य वणीत आलेल्‍या एका तरुणीची फसवणुक करुन बळजबरीने देहविक्री केल्‍या जात असल्‍याची तक्रार नागपुर येथील एका सामाजिक संघटनेने पोलीसात केली होती. ठाणेदार अजित जाधव यांच्‍या आदेशाने पोलीसांनी येथील रेड लाईट एरियात सर्च करुन 22 वर्षीय तरुणीची सुटका केली. ही कारवाई गुरुवार दि. 13 जुलैला सायंकाळी करण्‍यात आली. A social organization in Nagpur had complained to the police that a young woman was being cheated and forced into prostitution.

जम्मू खान (24) असे तरुणीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपींचे नांव आहे तो येथील खरबडा मोहल्‍ला परिसरातील निवासी आहे. राजस्‍थान मधुन कामाच्‍या शोधात आलेल्‍या तरुणीची व त्‍याची ओळख झाली. चांगले पैसे मिळणार असल्‍याचे सांगुन त्‍याने तीला फसवत देहविक्रीच्‍या दलदलीत ढकलले.

येथील प्रेम नगर नामक रेड लाईट एरियात एका तरुणीकडुन बळजबरीने देहविक्री केल्‍या जात असल्‍याची माहिती नागपुर येथील फ्रिडम फर्म संघटनेला मिळाली. संघटनेचे पदाधिकारी वणीत पोहचले त्‍यांनी याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करुन पोलीस पथकांसह धाडसञ अवलंबले. याप्रसंगी तरुणीची सुटका करण्‍यात आली असुन फरार आरोपी जम्‍मु याचेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009