Home Breaking News घ्या…..झाली सुरवात विकासकामांची.!

घ्या…..झाली सुरवात विकासकामांची.!

● मतदारांना जे अपेक्षित तेच झालं, टागोर चौकात ट्यूबवेल कामाचे भूमिपूजन

C1 20251224

मतदारांना जे अपेक्षित तेच झालं, टागोर चौकात ट्यूबवेल कामाचे भूमिपूजन

Pilitical News :
बुधवारी प्रभाग क्रमांक 10, टागोर चौक, वणी येथे नगरपरिषदेच्या ट्यूबवेल कामाचा नारळ फोडून विधिवत शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीनंतरचे हे पहिलेच भूमिपूजन व पहिले विकासकाम असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. Come on….. development work has begun!

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

याप्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या आत्राम, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, प्रभाग क्रमांक 10/11 चे नवनिर्वाचित नगरसेवक आरती वांढरे, रेखा कोवे, अनिल चिंडलिया, लवलेश लाल व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीदरम्यान दिलेले शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवत भारतीय जनता पार्टीने विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात आहे. पारदर्शकता, जनहित आणि दर्जेदार विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखाली वणी शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी माजी आमदार बोदकुरवारयांनी व्यक्त केला.

Img 20250103 Wa0009

नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा विकासाच्या बाजूने असून, शहराच्या प्रगतीसाठी अशाच ठोस आणि लोकाभिमुख कामांना पुढील काळात वेग मिळणार असल्याचे या पहिल्याच विकासकामाच्या शुभारंभातून स्पष्ट झाले आहे.
Rokhthok

Previous articleपालिकेत विरोधकांचा का उडाला “धुव्वा”..!
Next articleआणि…. हाफिज (टापू)चा भाजपला पाठिंबा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.