● विकासकामांचे श्रेय बोदकुरवार यांनाच
● 22 गावांत पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Political News: वणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना (शिंदे), रिपाई (आठवले गट), लहुजी सेनेचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत जात आहेत. कोरोनाचा काळ सोडता मागील अडीच वर्षांत या मतदारसंघाचा झपाट्याने कायापालट झाला. समाजाच्या सर्वच स्तरांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याची कमाल साधणारे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी आता विविध स्तरावरून नागरिक एकवटले आहेत. Constituency changed rapidly
बुधवारी बोदकुरवार यांनी वणी तालुक्यातील 22 गावांत पदयात्रा काढली. त्यावेळी सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. बोदकुरवार हे जनतेचे हक्काचे नेते व खऱ्या अर्थाने वणी मतदारसंघातील लाडक्या बहिणींचे भाऊ ठरत आहेत. त्यांनी जाती-धर्म यांचा विचार न करता सर्वच ठिकाणी विकासकामे करण्यावर भर दिला.
कोरोनानंतर मिळालेल्या अडीच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून टाकला आहे. गाव तेथे रस्ता ही संकल्पना मतदारसंघात पूर्णत्वास आणली आहे. विदर्भातील दुसरे सांस्कृतीक सभागृह वणीत साकारले आहे. अनेक वर्षांपासून वणी येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. तब्बल 140 कोटींची ही योजना आणली आहे. पुढील 60 वर्षांसाठी हा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अनेक वर्षानंतर वणीत तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यश मिळाले आहे.
वणी, मारेगांव व झारी तिन्ही तालुक्यात केलेली कामे आता विरोधकांच्या डोळ्यात खुपणारी असली तरी ग्रामस्थांना मूलभूत सुविधा त्यांनी पुरविल्या आहेत. वणी तालुक्यात रस्ते, नवीन वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, न्यायालयाची नवीन सुसज्ज इमारत साकारत आहे.
शेतकरी हितासाठी प्राथमिकता देत शेतमाल घरी आणण्यासाठी पाणंद रस्त्यांची खरी गरज ओळखून 17 कोटीचे पाणंद रस्ते बोदकुरवार यांनी मतदारसंघात आणले आहेत. आता या रस्त्यांना व्ही.आर. नंबर देऊन हे रस्ते डांबरीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. शांत, संयमी व सुसंस्कृत अशी संजीवरेड्डी बोदकुरवार यांची छबी असल्याने त्यांच्यासाठी या निवडणुकीत आता सर्वसामान्य माणूस पुढे आला आहे.
ROKHTHOK NEWS






