Home Breaking News मतदारसंघाचा दौरा आणि गणरायांचे दर्शन

मतदारसंघाचा दौरा आणि गणरायांचे दर्शन

● विजयबाबु चोरडीयांचा झंझावात

C1 20240913 14093527

विजयबाबु चोरडीयांचा झंझावात

Wani News | सामाजीक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजयबाबु चोरडीया यांनी वणी मतदारसंघाचा दौरा आरंभला आहे. गणरायाचे दर्शन घेत गावगाडयात नागरीकांना भेटत आहेत तसेच गणेश मंडळांना सुध्‍दा भेटी देत असल्‍याने भाविक भक्‍तांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे. Vijaybabu Chordia has started his tour of Wani Constituency.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे त्‍यातच सण उत्‍सवाचे दिवस. गणरायाचे व ग्रामस्‍थांचे दर्शन घेण्‍याचा सुवर्णयोग जुळून आला आहे. विजयबाबु चोरडीया यांनी मतदारसंघात झंझावाती दौरा सुरु केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्‍या रणसंग्रामात उतरायचेच असा चंग बांधल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. आरोग्‍य सेवेचा विडा सुध्‍दा त्‍यांनी उचलल्‍याचे दिसत आहे. शिवाय समाज कार्यात सातत्‍याने ते अग्रेसर तर असतात.

नवसाला पावणाऱ्या बाबापुर येथील गणरायाचे सर्वप्रथम दर्शन घेत त्‍यांनी दौऱ्याला सुरुवात केली. त्‍यांनी मतदारसंघातील अनेक गावात ग्रामस्‍थांच्‍या भेटीगाठी घेतल्‍या तसेच गणेश मंडळांना सदिच्‍छा भेटी दिल्‍यात. मुकुटबन, झरी, दुर्भा व सतपल्ली येथील नवजीवन गणेश मंडळाला भेट दिली. याप्रसंगी येथील मंडळाच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी विजय चोरडिया यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले आणि भव्य सत्कार केला.

Img 20250103 Wa0009

वणी  विधानसभा क्षेत्रातील  गावा गावात जाऊन गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश दर्शन  करणार असल्याचा मानस विजय चोरडिया यांनी व्‍यक्‍त केला. त्‍या प्रमाणेच मतदारसंघातील सर्वसामान्‍य नागरीकांना भेडसावणाऱ्या आरोग्‍य विषयक असो अथवा अन्‍य समस्‍या सोडविण्‍याचा संकल्‍प केला.
Rokhthok News