● WCL च्या धोरणाचा फटका
● घरातील साहित्याची वाताहत
Wani News :
वेकोलीच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसतोय. नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह बदलल्याने कोलेऱा (पिंपरी) गावात थेट पाणी घुसले. यामुळे अंदाजे सात ते आठ घरे पाण्याखाली गेली. घरातील साहित्याची वाताहत झाली. तर सततच्या मुसळधार पावसाने तालुक्यात चांगलेच थैमान घातले आहे. Continuous heavy rains wreaked havoc in the taluka.

नदी-नाल्याचा प्रवाह वेकोलीच्या डम्पिंग मुळे बदलतोय. खान परिसरातील गावे नेहमीच वेकोलीच्या गलथान कारभाराने प्रभावित होताना दिसते आहे. कोलेरा (पिंपरी) लगत WCL प्रशासनाने मातीची डंपिंग उभारल्याने नाल्याचे पाणी थेट गावाच्या दिशेने वळवले गेले. परिणामी, गावातील शेतकरी, कुटुंबे आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आहे. वीज पुरवठा खंडित झाला असून, विजेच्या ताराही तुटल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी कोलेऱा गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी WCLच्या सब एरिया मॅनेजर यांच्याशी तातडीने संपर्क साधून गावकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा, गावकऱ्यांना घेऊन कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडू, असा इशाराही दिला आहे.
गावकऱ्यांच्या जिवावर बेतलेला हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. WCL प्रशासन व ग्रामपंचायत यांनी जबाबदारी निश्चित करून तात्काळ मदत व पुनर्वसन करावे, अशी मागणी काजल जितेंद्र बोंडे (ग्रा.पं.सदस्य), गोवर्धन पीदुरकर, प्रवीण मांडवकर, विशाल आसुटकर, देविदास वाघमारे, नितीन कुरेकर, बाबाराव आसुटकर, नंदू झट्टे, अंबादास अतकर, प्रकाश झाडे, सुरज लोढे, नितीन बोंडे, बापूजी ढोके यांनी केली आहे.
ROKHTHOK NEWS






