Home Breaking News उन्हाच्या तडाख्यात वृद्धाचा मृत्यू

उन्हाच्या तडाख्यात वृद्धाचा मृत्यू

● मांगली शिवारात आढळला मृतदेह

C1 20250421 07515012

मांगली शिवारात आढळला मृतदेह

Sad News : मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मांगली शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास 60 ते 70 वर्षे वयोगटातील अनोळखी वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. The discovery of old man dead body has created excitement in the area.

घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस ठाण्याचे PSI चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण उन्हामुळे झालेला उष्माघात असल्याचे बोलले जात आहे.

सदर वृद्ध इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो कोणाच्या ओळखीचा असल्यास कृपया मुकुटबन पोलीस स्टेशनशी ( 8975173354) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009