Home Breaking News “न भूतो न भविष्य:ती”..विकासाची गंगा गावागावात

“न भूतो न भविष्य:ती”..विकासाची गंगा गावागावात

● शेकडो कोटींची विकासकामे मतदारसंघात

C1 20241109 09524955

शेकडो कोटींची विकासकामे मतदारसंघात

 

Political News | वणी विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी विकासकामे थांबली होती. ज्या गावात मूलभूत सुविधा नव्हती. त्या गावात देखील भाजपने रस्ते, शुद्ध पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. न भूतो न भविष्य ती..विकासाची गंगा गावागावात पोहचल्याचे दिसत असून शेकडो कोटींची विकासकामे मतदारसंघात झाली आहे किंवा पूर्णत्वास जात आहे. Development works worth hundreds of crores were done in the constituency

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जनहिताच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वांगीण विकासाची कास धरली आणि सत्यात उतरविण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात देण्यात आला. मूलभूत व शाश्वत विकासकामावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करण्यात आले. म्हणूनच वणी मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे.

वणी शहरालगत चिखलगांव जवळचे रेल्‍वे गेट व वरोरा मार्गावरील रेल्वे सायडिंग जवळील रेल्वे गेट वर प्रत्येकी शंभर कोटी असे दोनशे कोटी रुपयांचे उडानपुल होताहेत. याकरिता केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची तरतूद केली. या उडानपुलामुळे वणीकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Img 20250103 Wa0009

वणी शहराची तहान भागविण्‍यासाठी कार्यान्‍वीत योजना अपुरी पडत होती. भविष्‍यात वणीकर नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागु नये याकरीता ‘अमृत’  पाणीपुरवठा ही 140 कोटी रुपयांच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेचा पाठपुरावा आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला. सर्व प्रक्रीया व तांञीक बाबीची पुर्तता करुन योजना खेचून आणली आणि आता ती झपाट्याने पूर्णत्वास जाणार आहे.

मैदानी खेळात वणींचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे, त्‍यांना क्रीडानुकूल वातावरण मिळावे हे स्‍वप्‍न उराशी बाळगुन आ. बोदकुरवार यांनी प्रधानमंत्री जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. तसेच 65 कोटी रुपये अंदाजीत खर्च असलेल्‍या न्‍यायालयाची इमारतीसाठी निधीची उपलब्धता करण्यात आली.

सातत्य आणि पाठपुरावा महत्वाचा असून विकासाचे व्हिजन असल्याने मतदारसंघात पायाभूत सुविधेचे जाळे विणण्यात येत आहे. शहरातील अंतर्गत रस्ते सीमेंट काँक्रीटचे झाले आहेत तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वर भर दिल्याजात आहे. अडेगांव -खातेरा येथील नदीवर 25 कोटी रुपयांचा पुल बांधण्‍यात आला. तर येथील राम शेवाळकर नाटय संकुल निर्माण झाले आहे. न भूतो न भविष्य ती..विकासाची गंगा गावागावात पोहचल्याचे दिसत आहे.
ROKHTHOK NEWS