Home Breaking News धडाका….राजू उंबरकर यांना “प्रहार”चा पाठींबा

धडाका….राजू उंबरकर यांना “प्रहार”चा पाठींबा

● मनसेचा ग्राफ मतदारसंघात वाढला

523
C1 20241112 08122553

मनसेचा ग्राफ मतदारसंघात वाढला

Political News | विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशा राजकीय घटना घडीमोडींना वेग आला आहे. आज तिसऱ्या आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना जाहीर पाठींबा घोषित केला. या आशयाचे पत्र झरी तालुकाध्यक्ष संतोषसिंग सेंघर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले. Prahar Jan Shakti Party announced its public support to Maharashtra Navnirman Sena candidate Raju Umbarkar.

Img 20250422 wa0027

राज्यात तिसरा पर्याय म्हणून छत्रपती संभाजी महाराज, शेतकरी नेते मा.खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वामनराव चटप व बच्चू कडू यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्तीचे संघटन केले. तर या आघाडीकडून विधानसभेच्या अनेक जागांवर उमेदवार देण्यात आले.

Img 20250103 Wa0009

विधानसभा मतदारसंघात प्रहार किंवा अन्य घटक पक्षाचा कुठलाही अधिकृत उमेदवार नसल्याने या प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष सिंगर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांना पाठिंबा घोषित करून या विधानसभेमध्ये मनसे सोबत प्रहार जनशक्ती पक्ष काम करणार असल्याची ग्वाही दिली.

पाठिंब्याचे पत्र झरी तालुकाध्यक्ष सेंगर यांनी मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्याकडे सुपूर्द केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या पाठिंबामुळे झरी तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बळ अधिक वाढेल. यावेळी प्रहार चे कारण सोयाम, शंकर पडकार, महेंद्र गेडाम, गणेश कुडमेथे, सुरज जाधव, अरुण कोटनाके, प्रकाश धोंगडे, दिनेश काटकर, मनोज देवालकर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रविण उंबरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार,विभाग अध्यक्ष विनोद कुचनकार, कैलास निखाडे, बंडू येसेकर विलन बोदाडकर, अंकुश बोढे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Rokhthok News