● संघटनात्मक बांधणीला देणार प्राधान्य
Wani News | यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाफर एन. खान यांनी वरिष्ठांच्या आदेशाने शेख अफसर शेख अजीज यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीने संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार आहे. Sheikh Afsar Sheikh Aziz has been appointed as District Vice President.

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, विधानसभा निहाय पक्ष बळकटीकरण करताहेत. तळागाळातील अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पक्ष पदाधिकारी करताना दिसत आहेत. काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने सुद्धा निवड- नियुक्त्या करून संघटना बांधणीचा विडा उचलला आहे.
अखिल भारतीय कांग्रेस कमिटी च्या उच्च आदर्शा नुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. शेख अफसर शेख अजीज यांची अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याने वणी विभागात पक्षाला बळ मिळणार आहे.
Rokhthok News