● मारेगाव तालुक्यातील घटना
Sad News Maregaon | मारेगाव तालुक्यातील सुरला येथे वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय महिलेने विषाचा घोट पोटात रिचवत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान घडली. While everyone in the house was asleep, she took out a box of insecticides and drank the poisonous liquid.

प्रतिभा संतोष दूधगवळी (38) असे मृतक महिलेचे नाव आहे. घरातील सर्व मंडळी साखरझोपेत असताना तिने कीटकनाशकांचा डब्बा काढला व विषारी द्रव प्राशन केले.
घडलेली घटना घरच्या मंडळींना कळताच त्यांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तिने जीवनयात्रा का संपवली हे अस्पष्ट असून तिच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. पुढील तपास मारेगाव पोलीस करताहेत.
Rokhthok News