● शासनाचे रेती धोरण फसवे
● ट्रॅक्टर सोडण्यासाठी तोडी केल्याचा आरोप
● कारवाई कोणावर होणार याची उत्सुकता
Department of Revenue News | वणी तहसील मधील नायब तहसीलदारांनी अवैध रेतीचा ट्रॅक्टर पकडला. तो सोडण्यासाठी सत्तर हजार रुपयांची “तोडी” केल्याचा आरोप प्रसारित केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला. या व्हायरल व्हिडीओ ने महसुलची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. प्रसारित व्हिडीओची सत्यता पडताळण्याची गरज निर्माण झाली असून नेमकी कारवाई कोणावर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. There is a need to verify the authenticity of the video and who exactly will be taken action against

जनतेला योग्य दरात रेती उपलब्ध व्हावी याकरिता शासनाने रेतीधोरण आखले. परंतु यात सर्वसामान्य जनतेला कोणताही लाभ होत नसल्याचे वास्तव उजागर होत आहे. रेती चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. रेती तस्कर सैराट झाल्याचे दिसून येत असले तरी अधिकाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासनाने राबवलेले धोरण फसवे असल्याचे स्पष्ट होत आहे.
समाजमाध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती चा भांडाफोड करण्यात आला आहे. एका नायब तहसीलदारांनी घोन्सा येथील व्यक्तीचा ट्रॅक्टर पकडला व 70 हजार रुपये घेवून सोडून दिल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने केलेल्या आरोपातील तथ्य आणि सत्यता पडताळणे गरजेचे आहे.
● जिल्हाधिकारी कारवाई करेल का ? ●
समाज माध्यमातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर त्या व्यक्तीने केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहे. त्यातील सत्यता तपासण्याची जबाबदारी आपसूकच जिल्हाधिकारी यांचेवर येते. आरोपात तथ्य असेल तर संबंधित अधिकारी दोषी ठरणार आहे. मात्र ते आरोप तथ्यहीन व बिन बुडाचे असतील तर समाजमाध्यमावर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर नेमकी काय कारवाई होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
● त्या अधिकाऱ्याला खुलासा मागणार ●
समाजमाध्यमावर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे कळले. परंतु याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. तसेच संबंधित अधिकारी रजेवर आहेत. ते कर्तव्यावर परतल्यानंतर त्यांना खुलासा मागण्यात येईल त्यानंतर त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
रामचंद्र खिरेकर
प्रभारी तहसीलदार, वणी
Rokhthok News