● शैक्षणिक व्यवस्थेचा उडाला बोजवारा
Education News Maregaon : मारेगांव तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. पुर्व परवानगी शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर ताटकळत उभे रहावे लागले. ही बाब तेथील सरपंच सुषमा रुपेश ढोके यांनी आधुनिक साविञी होत उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवले. Sarpanch Sushma Rupesh Dhoke became a “savitri” and imparted lessons of education to the present students.
मारेगांव तालुक्यातील कानडा येथे एक ते चार पर्यंत वर्ग आहेत. तेथे दोन शिक्षक असुन त्यातील एक स्वयं शिक्षक आहेत तर दहा विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेची वेळ झाली, तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचले माञ शिक्षकच गैरहजर होते. शाळेच्या बाहेर ते ताटकळत उभे असल्याचे सरपंच यांना दिसले.
सरपंच सुषमा ढोके ह्या मनसेचे तालुका प्रमुख रुपेश ढोके यांच्या पत्नी आहेत. त्यांनी तात्काळ शाळेचा कारभार हाती घेत त्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातील शिक्षणाचे धडे गिरवले. ही बाब निश्चितच अभिनंदनीय असली तरी शिक्षकांनी याबाबत केंद्र प्रमुखांना अवगत केले असते तर ही नामुष्की शिक्षण विभागावर आली नसती.
● त्या शिक्षकांवर कारवाई होणारच●
कनाडा येथील नियमीत शिक्षकांने रजेबाबत अर्ज देत रजा घेतली होती तर स्वंय शिक्षक अचानक आजारी पडल्यामुळे शाळेत गेले नाहीत. परंतु शाळेत गैरहजर राहण्यापुर्वी त्यांनी केंद्र प्रमुखांना अवगत करणे गरजेचे होते. केंद्र प्रमुखांनी पर्यायी व्यवस्था केली असती, याप्रकरणी शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल.
एस. ए. काटकर
प्रभारी गटशिक्षणाधिकारी
Rokhthok News






