Home Breaking News निवडणूक रणसंग्राम…. आमदारांसह दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक रणसंग्राम…. आमदारांसह दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

● तिसऱ्या पॅनलची शक्यता ● बाजार समितीच्‍या 18 जागेसाठी 94 अर्ज

1419

तिसऱ्या पॅनलची शक्यता
बाजार समितीच्‍या 18 जागेसाठी 94 अर्ज

रोखठोक | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूकीचा कार्यक्रम बऱ्याच कालावधी नंतर लागला. निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्‍याचे संकेत मिळायला लागले असुन भाजपा आणि महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी 18 जागेसाठी 94 अर्ज दाखल झाले आहेत.या निवडणुकीत विद्यमान आमदारासह दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. The reputation of two former MLAs along with the current MLA is at stake in the election

Img 20250422 wa0027

बाजार समितीच्‍या मागील निवडणुकीत आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांच्‍या गटाने कडवे आवाहन निर्माण केले होते माञ अखेरच्‍या क्षणी विरोधकांनी बाजी मारली होती. त्‍या घटनेची परतफेड करण्‍यासाठी आमदार बोदकुरवार यांनी व्‍यूहरचना आखली आहे. उमेदवारी मागे घेण्‍याच्‍या तारखे पर्यंत “वेट अँड वॉच” ची भुमीका ते अवलंबणार आहेत.

Img 20250103 Wa0009

बाजार समितीच्‍या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. प्रतिष्‍ठेच्‍या निवडणुकीत सहकारातील धुरंधर आपले नशिब अजमावणार आहे. भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार असल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीच्‍या वतीने माजी आमदार वामनराव कासावार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

बाजार समितीच्‍या निवडणुकीकरीता आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांनी नियोजनबध्‍द रणनिती आखली आहे. शिवसेना उध्‍दव ठाकरे गट व कॉग्रेस पक्षातील उमेदवार वगळता अन्‍य राजकीय पक्षातील तुल्‍यबळ व विजयाची खाञी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्‍याने आपल्‍या गटात खेचण्‍याचा प्रयत्‍न असेल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. यामुळेच यावेळी दोन गटातील उमेदवारांत चुरशीच्‍या लढती होणार असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.
वणी : बातमीदार