● वितरणाच्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा
Sad News : येथील एमआयडीसी परिसरातील चुना भट्टी समोरील विजेच्या खांबावर वीज प्रवाहित करण्यासाठी चढलेल्या कामगाराला Electric shock विजेचा जबर धक्का बसला. यात 30 वर्षीय कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 20 एप्रिलला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली. A worker who climbed an electric pole to conduct electricity was electrocuted.
अतुल भाऊराव कोसारकर (30) असे मृताचे नाव आहे तो आपल्या परिवारासह मोहूर्ली येथे वास्तव्यास होता. वीज वितरण कंपनीने नेमलेल्या विद्युत कंत्राटदाराकडे तो वीज दुरुस्तीचे काम करायचा. शनिवारी झालेल्या वादळी-वाऱ्याने मोठया प्रमाणात झाडे कोसळली. यामुळे विद्युत खंडित झाली होती. वीज वितरण कंपनीने वीज प्रवाहित करण्यासाठी विद्युत कंत्राटदारांना मौखिक आदेश दिले होते असे समजते.
एमआयडीसी परिसरातील वीज खांबावर कोसळलेल्या झाडाची कटाई करण्याचे काम सुरू होते. काम करत असताना वीज वितरणचे दोन कर्मचारी घटनास्थळी हजर होते. अतुल खांबावरील झाडाची कटाई करण्यासाठी खांबावर चढला. परिसरातील विद्युत प्रवाह खंडित करण्याची जबाबदारी वितरणाच्या कर्मचाऱ्यांची होती. प्रवाह खंडित न केल्याने अतुलला Electric shock विजेचा जबर धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
होतकरू अतुलच्या दुर्दैवी मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. परंतु घटनास्थळी उपस्थित असलेले वीज वितरणचे कर्मचारी लगेचच घटनास्थळावरून नदारद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Rokhthok News






