Home Breaking News आणि…त्याने मृत्यूला कवटाळले

आणि…त्याने मृत्यूला कवटाळले

● परिवाराचा आधारवड हरपला

C1 20250413 11454638

परिवाराचा आधारवड हरपला

Sad News | आर्थिक विवंचना शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरताना दिसत आहे. तालुक्यातील कोना येथे वास्तव्यास असलेल्या 37 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवार दिनांक 12 एप्रिलला रात्री 8 वाजता उघडकीस आली. A 37-year-old smallholder farmer ended his life by hanging himself.

गणेश जगन्नाथ तुराणकर (37) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह कोना या गावी वास्तव्यास होता. त्याचे जवळ तीन एकर शेती असून त्यावर तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. परंतु मागील काही वर्षांपासून आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने आर्थिक विवंचनेत तो पुर्णतः गुरफटला होता. त्यातच खाजगी कर्जाचा डोलारा वाढत गेल्याने त्याने आत्मघाती निर्णय घेतला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे.

घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. रात्रीच्या सुमारास त्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब पारिवारिक मंडळींना कळताच त्यांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleSand smuggling : हायवा ट्रक व जेसिबी मशीन ताब्यात
Next articleVery Sad : दोन घटनेत दोघांची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.