Home Breaking News लाडकी बहीण योजनेची नोंदणी करणाऱ्यांचा गौरव व अभिनंदन सोहळा

लाडकी बहीण योजनेची नोंदणी करणाऱ्यांचा गौरव व अभिनंदन सोहळा

● आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पुढाकार

C1 20240821 19093406

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पुढाकार

Wani News | वणी मतदारसंघात लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली, त्या सर्व कर्तबगार योद्यांचा गौरव व अभिनंदन सोहळा तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढाकार घेतला असून गुरुवार दिनांक 22 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शेतकरी मंदिर वणी येथे कार्यक्रम पार पडणार आहे. In Wani Constituency, Ladki Bahin Yojana was registered in large numbers.

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करून बहिणींना रक्षाबंधनानिमित्त तीन हजार रुपयांचे गिफ्ट दिले आहे. ही योजना निरंतर सुरू राहणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रात लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत. अनेक बहिणींना तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतोय मात्र त्यांना सुद्धा तीन महिन्याची एकत्रित रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात लाडक्या बहिणीची नोंदणी करण्यात आली आहे. याकरिता वणी तालुका व वणी शहर मधील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर, आयसीआरपी, बचत गट अध्यक्ष, सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी भरीव कार्य केले आहे. या सर्व कर्तबगार योद्यांचा गौरव व अभिनंदन सोहळा तसेच रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009