Home Breaking News ढाब्यावर दारू प्याल तर कारवाईला सामोरे जाल

ढाब्यावर दारू प्याल तर कारवाईला सामोरे जाल

● उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ● "रोखठोक" च्या बातमीचा परिणाम

1507

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
“रोखठोक” च्या बातमीचा परिणाम

Wani News | वणी शहराच्या सभोवताल तसेच शहरातसुद्धा ढाबे तथा खानावळी आहेत. स्वादिष्ट जेवणासोबतच मद्यपींसाठी मदिरेची व्यवस्था करण्यात येते. याबाबत “रोखठोक” मधून वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. परिणामी उत्पादन शुल्क विभागाच्या यवतमाळ व पांढरकवडा येथील भरारी पथकाने शुक्रवार दिनांक 28 जुलै ला रात्री खानावळी व ढाब्यावर धाडी टाकल्यात. या कारवाईत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. Yavatmal and Pandharkavda of Excise Department raided the hotel (Dhaba) on Friday 28th July night.

Img 20250422 wa0027

उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, अवैद्य मद्यविक्रेते बेभान झाले आहेत. तालुक्यातील ढाबे, खानावळी अवैद्य दारू विक्रीचे मुख्य स्रोत बनले आहेत. ग्रामीण भागातील ढाब्यावर दारू सहज उपलब्ध होत असल्याने त्यांचेवर सातत्याने कारवाई होणे अपेक्षित आहे.

Img 20250103 Wa0009

यवतमाळ व पांढरकवडा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने “रोखठोक”च्या बातमीची दखल घेत धडक कारवाया केल्या आहेत. जुन्या बसस्थानक जवळील किरण रेस्टॉरंट व नांदेपेरा मार्गावरील आंगण ढाब्यावर धाडसत्र अवलंबत चार ग्राहकांसह दोन हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईने अवैद्य दारू विक्रीला आळा बसणार आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार कारवाया केल्या तरच अवैद्य दारू विक्रीचे नेटवर्क संपुष्टात येणार आहे. सदर कारवाई निरीक्षक जे. डी. जठार, निलेश वानखडे, यवतमाळ भरारी पथकाचे संतोष बटकर, चंदू दरोडे व वणीचे निरीक्षक संजय बोडेवार व अन्य कर्मचारी यांनी केली.
Rokhthok News