● चार दिवसांपूर्वी केले होते विष प्राशन
Sad News Wani : तालुक्यातील वांजरी येथे वास्तव्यास असलेल्या 42 वर्षीय विवाहितेने 14 डिसेंबरला कीटकनाशक प्राशन केले होते. तिला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चार दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवार दिनांक 18 डिसेंबरला दुपारी तिची प्राणज्योत मालवली. A 40-year-old married woman living in Wanjari had consumed insecticide on December 14.
मनीषा विजय नक्षीणे (42) असे मृतक महिलेचे नाव आहे, ती विवाहित असून वंजारी येथे वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी तिने आपल्या राहत्या घरातच विषारी द्रव प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी तडकाफडकी तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले.
डॉक्टरांनी तात्काळ महिलेवर उपचार सुरू केले मात्र प्रकृती साथ देत नव्हती. तिची मृत्यूशी झुंज सुरू होती, शरीरात विषाचा प्रभाव वाढला आणि सोमवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News






