● अस्थिर परिस्थिती मुळे घेतला निर्णय
Indurikar maharaj news | निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन 3 नोव्हेंबरला येथील शासकीय मैदानावर करण्यात आले होते. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा समाजबांधवांच्या भावना संतप्त आहेत तर राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे. यामुळे इंदुरीकर महाराजांनी वणीतील कार्यक्रम रद्द केला आहे. Indurikar Maharaj has canceled the program in Wani.

गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इंदुरीकर महाराजाचे किर्तन हा राज्यात वारकरी जनतेचा कुतुहलाचा विषय असतो. त्यांच्या विनोदी, परखडपणा व प्रबोधन पुरक किर्तनाने राज्यातील जनता भारावुन गेली आहे. त्याच्या किर्तनाची संधी वणीकरांना तीन नोव्हेबरला मिळणार होती.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच धुमसतोय, समाजबांधव प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. समाजबांधवांच्या भावना लक्षात घेत इंदुरीकर महाराजानी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला आहे. त्यातच अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही.
अशाप्रसंगी कोठेही किर्तनाचे कार्यक्रम करू नये अशी सूचना जिल्हाधिकारी यांचेकडूनही त्यांना प्राप्त झाल्याने अखेर वणीच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असे त्यांनी आयोजकांना कळविले आहे. त्यामुळे वणीचा शुक्रवारी होणारा कार्यक्रम तूर्तास स्थगीत करण्यात आला आहे. पुढील तारीख दिल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रा. टिकाराम कोंगरे यांनी दीली.
Rokhthok News