Home Breaking News नेमकं घडलयं काय….अखेर संजय खाडे निवडणुकीच्‍या रिंगणात

नेमकं घडलयं काय….अखेर संजय खाडे निवडणुकीच्‍या रिंगणात

● पञपरिषदेत खाडे झाले भावनीक ● वणीत रंगणार चौरंगी लढत

1412
C1 20241104 17531459

पञपरिषदेत खाडे झाले भावनीक
वणीत रंगणार चौरंगी लढत

Political News | वणी विधानसभेच्‍या निवडणुकीत नामांकन मागे घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी संजय खाडे उमेदवारी ठेवणार की मागे घेणार यांची चर्चा शिगेला पोहचली होती. नेमकं घडलयं काय…. खाडे यांनी पक्ष कार्यकर्ते,  पदाधिकारी व शिवसेना उबाठा जिल्‍हाप्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांच्‍या आग्रहास्‍तव निवडणुक रिंगणात उतरण्‍याचा निर्णय घेतला. पञपरिषदेत बोलतांना खाडे कमालीचे भावनीक झाले होते, त्‍यांना अश्रु अनावर झाले. सर्व सामान्‍य नागरिकांच्‍या हितांसाठी “आता लढणार आणि जिंकणारच” असे त्‍यांनी याप्रसंगी स्‍पष्‍ट केले. What really happened…. Finally Sanjay Khade in the election arena.

Img 20250422 wa0027

अर्ज मागे घ्‍यायच्‍या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली आहे. आता अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजू मधुकरराव उंबरकर (मनसे), संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा), संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), अपक्ष संजय रामचंद्र खाडे, केतन नत्थुजी पारखी, नारायण शाहु गोडे, हरिष दिगांबर पाते, निखिल धर्मा ढुरके, राहुल नारायण आत्राम असे 12 उमेदवार वणी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत,

Img 20250103 Wa0009

संजय खाडे यांच्‍या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपचे संजीवरेडडी बोदकुरवार,  मनसेचे राजु उंबरकर, मविआ चे संजय देरकर व अपक्ष संजय खाडे अशी तुल्‍यबळ चौरंगी लढत होईल असे दिसत आहे. खाडे यांच्‍या निर्णयामुळे वणीत “सांगली पॅटर्न” ची पुनरावृत्‍ती होणार का हे बघणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. कारण यावेळी सुध्‍दा खाडे यांचे सोबत शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख विश्‍वास नांदेकर  रनसंग्रामात उतरणार आहे. त्‍या सोबतच कॉग्रेस पक्षाचे जेष्‍ट नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांनी खाडे यांना साथ द्यायची असा निर्णय घेतला आहे.

पञ परिषदेत शिवसेना जिल्‍हाप्रमुख विश्‍वास नांदेकर,  नरेंद्र पाटील ठाकरे, पुरुषोत्‍तम आवारी, प्रशांत गोहोकार, गौरीशंकर खुराना, शिवसेना तालुका प्रमुख मारेगांव संजय आवारी,  वणीचे प्रसाद ठाकरे, झरीचे चंद्रकांत घुग्‍गुल, कॉग्रेसचे तेजराज बोढे, पवन एकरे,  सुनील वरारकर यांचे सोबतच शिवसेना उबाठा व कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News