Home Breaking News अखेर “प्रणय”चा मृतदेहच गवसला

अखेर “प्रणय”चा मृतदेहच गवसला

● तीन दिवसांपूर्वी पटाळा पुलावरून वर्धा नदीत मारली होती उडी..!

C1 20250829 13425377
Img 20250910 wa0005

तीन दिवसांपूर्वी पटाळा पुलावरून वर्धा नदीत मारली होती उडी..!

Sad News :
वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा गावाजवळील पुलावरून प्रणयने वर्धा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना दिनांक 27 ऑगस्टला घडली होती. रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या तरुणाने टोकाचे उचलले होते. अखेर तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच गवसला. Finally, the body of “Pranay” was found.

Img 20250103 Wa0009

जैन लेआऊट, वणी येथील रहिवासी प्रणय संजय गोखरे (22) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी तो सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. त्याने पटाळा येथील पुलावरून वर्धा नदीत उडी मारली होती. तीन दिवसांपासून त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता.

शोधमोहीम सुरू असताना बुधवारी दुपारी 12 वाजता बेलोरा पुलाजवळ, कुंभारी शिवारात वणीपासून तब्बल 9 किलोमीटर अंतरावर, प्रणयचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना ग्रामस्थांना आढळला. चिंचोलीचे माजी सरपंच जयंत निखाडे यांनी धाडस दाखवत नदीत उतरून तो मृतदेह बाहेर काढला व पोलिसांना पाचारण करण्यात आले.

ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुनील दूबे व मंगेश सलाम यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करताहेत.

होतकरू, हुशार असलेल्या “प्रणय” याने क्षुल्लक बाबीवरून टोकाचे पाउल उचलले आहे. या त्याच्या आत्मघाती निर्णयामुळे कुटुंबियांवर तसेच मित्रमंडळी वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्षणिक राग गिळण्याचा प्रयत्न केला असता तर पुढील अनर्थ टळला असता असे बोलल्या जात आहे.
Rokhthok