Home Breaking News रेणुका मातेच्या अखंड ज्योतीने दुर्गा माता मंदिराचे लोकार्पण

रेणुका मातेच्या अखंड ज्योतीने दुर्गा माता मंदिराचे लोकार्पण

● अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

C1 20231017 12331582

अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Wani News | दुर्गा माता मंदिराचा जिर्णोध्दार पुर्ण झाला असून घटस्थापनेच्या दिवशी रेणुका मातेच्या अखंड ज्योतीने मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर भक्तांसाठी भव्य मंदिर खुले करण्यात आले आहे. दरम्यान अखंड ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी दुर्गा माता मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. Devotees throng Durga Mata temple to have a glimpse of Akhand Jyoti.

C1 20231017 12324272

नवशक्ती दुर्गा माता मंदिर येथील समितीने माहुरगड येथील महाराष्ट्रातील साडेतीन जागृत शक्तीपीठापैकी एक श्री रेणुका देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करुन आणली. ही संकल्पना नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांची होती.

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 15 ऑक्टोबर ला सायंकाळी 5 वाजता वणी नगरीत अखंड ज्योत आणल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या जल्लोषत या ज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ती अखंड ज्योत दुर्गा माता मंदिरात प्रवेश करून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हि अखंड ज्योत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

अखंड ज्योत आणण्यासाठी ज्योत यात्रेत समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या सोबत समितीचे दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, स्वप्नील बिहारी, मारोती गोखरे या अखंड ज्योत यात्रेचे स्वागत करण्यासाठी दुर्गा माता मंदिर समितीचे सर्व सदस्य, वणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News

Previous articleसीसीटीव्ही ने उलगडले ‘कोडे’, सरपंच अपात्र
Next articleRaas Dandiya | ‘रुचिता’ने जिंकली सायकल
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.