Home Breaking News माजी आमदार नांदेकरांचा देरकरांवर घणाघात

माजी आमदार नांदेकरांचा देरकरांवर घणाघात

● संस्‍थेची जमीन विनापरवानगी विकल्‍याचा आरोप

C1 20241111 07114472
संस्‍थेची जमीन विनापरवानगी विकल्‍याचा आरोप
C1 20241111 07193778
पत्रपरिषदेत नांदेकरांनी केले आरोप

Political News : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप – प्रत्‍यारोपाने राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर ज्‍या संस्‍थेचे सचिव आहे त्‍या संस्‍थेत कोटयावधीचा घोटाळा झाल्‍याचा आरोप माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदे‍तुन केला आहे. यामुळे विदेही जगन्‍नाथ बाबा यांना मानणारा मोठा भक्‍त वर्ग कमालीचा नाराज झाला आहे. विदेही जगन्‍नाथ बाबाच्‍या नावाने करोडोची माया जमा करण्‍यात येत असल्‍याचा घणाघाती आरोप नांदेकर यांनी केला आहे. Former MLA Nandekar attacked Derkar

पुजनिय संत विदेही जगन्‍नाथ महाराज यांचा भक्‍त परीवार पुर्व विदर्भात मोठया प्रमाणात आहे. जगन्‍नाथ महाराज यांच्‍या नावाने संस्‍था स्‍थापन करून देरकर परीवाराने भक्‍त मंडळीत आस्‍था निर्माण केली आहे. परंतु ठिकठिकाणी असणारे महाराजांचे मठ व दान करण्‍यात आलेल्‍या ज‍मीनीवर डोळा ठेवुन देरकर परिवार आपले इस्‍पीत साध्‍य करीत असल्‍याचा आरोप नांदेकर यांनी केला आहे.

मुकूटबन परीसरातील रूईकोट येथे जगन्‍नाथ महाराज संस्‍थेला मंदावार कुटूंबीयांनी 5 एकर शेत जमीन दान केली होती. त्‍या जमीनीची वाहिती मंदावार परिवारातील सदस्‍य करत होते. तर विदेही जगन्‍नाथ महाराजांचे तेथे लहानशे मंदीर होते. त्‍या मंदीरात भक्‍त मंडळी पुजा अर्चना करत होते. त्‍या परीसरामध्‍ये बी.एस.इस्‍पात नामक कंपनीने जमीन अधिग्रहण करण्‍याचे ठरवले आणि जगन्‍नाथ महाराज संस्‍थानच्‍या 5 एकर जमीनीला अधिग्रहीत करण्‍याचा निर्णय घेतला.

Img 20250103 Wa0009

जमीन संस्‍थेला दान करण्‍यात आल्‍याने धर्मदाय आयुक्‍तांच्‍या परवानगी शिवाय ती जमीन खदेदी, विक्री करता येत नव्हती. तशा प्रकारचा कोणताही व्‍यवहार न करता त्‍या जमीनीवर संबधित कंपनीने उत्‍खनन करून अंदाजे 50 कोटी रूपयांच्‍या वर खनिज संपत्‍तीवर डल्‍ला मारला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (इडी)ने कंपनीला मनी लॉंड्रींग प्रतिबंध अधिनियम 2002 नुसार तपासणी बाबत पत्र पाठवले. तर महसुल प्रशासनाला पत्र पाठवुन या जमीनीचे विक्री, हस्‍तांतरण,  गहाण, धारणाधिकार इत्‍यादी बाबत कोणतेही हस्‍तांतरण तसेच बदल करण्‍यात येऊ नये असे सुचवले होते.

जगन्‍नाथ महाराज संस्‍थानने संबधीत जमीनीचा विक्री व्‍यवहार नुकताच केला आहे. परंतु तत्‍पुर्वी कोटयावधी रूपयांच्‍या कोळशाचे उत्‍खनन त्‍या कंपनीने केले. याप्रकरणी मोठया प्रमाणात गैरव्‍यवहार झाला असुन याला सर्वस्‍वी संस्‍थेचे सचिव संजय देरकर हे जबाबदार असल्‍याचा आरोप माजी आमदार विश्‍वास नांदेकरांनी केला आहे. तसेच याप्रकरणी उच्‍च न्‍यायालयात दाद मागुन फौजदारी प्रक्रीया करण्‍यात येईल त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हा हेतुपुरस्सर राजकीय स्टंट
विरोधकांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. बी.एस. इस्‍पात कंपनीला जमीन अधिग्रहित करायची होती. परंतु सदर जमीन संस्थेच्या नावाने असल्याने धर्मदाय आयुक्तांची खरेदी विक्री करिता परवानगी महत्वाची होती. तत्पूर्वी ईसार झालेला असल्याने त्यांनी उत्खनन केलं. विरोधक जे करताहेत हा राजकीय स्टंट असून त्यांचे आरोप निराधार आहेत, या प्रकरणी संस्था मानहानी दाखल करणार आहे.
संजय देरकर
सचिव,
जगन्नाथ महाराज देवस्थान, वेगाव
ROKHTHOK NEWS