Home Breaking News हेअर कलर चे सेवन, उपचारादरम्यान मृत्यू

हेअर कलर चे सेवन, उपचारादरम्यान मृत्यू

● जैताई नगर परिसरातील घटना

C1 20240804 21073284

जैताई नगर परिसरातील घटना

Sad News | जैताई नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीने चक्क वासमोल नामक हेअर कलर लिक्विड प्राशन केले. उपचारार्थ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रेफर करण्यात आलेले असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. A 55-year-old man drank a hair color liquid called Vasmol.

अनिल राजण्णा अंडलवार (55) असे मृतकाचे नाव आहे. ते शहरातील जैताई नगर परिसरात वास्तव्यास होते तसेच लालपुलिया परिसरात त्यांचे देशप्रेमी नामक हॉटेल आहे. त्यांनी शनिवारी आपल्या घरीच वासमोल हेअर कलर चा द्रवपदार्थ प्राशन केला. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. घरच्या मंडळींनी त्यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली, डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूरला पुढील उपचारासाठी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तिथे जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. त्यांनी तो विषारी द्रव का प्राशन केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009