Home Breaking News गळफास… अखेर त्यांनी संपवले जीवन

गळफास… अखेर त्यांनी संपवले जीवन

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News Wani | तालुक्यातील नांदेपेरा येथील 55 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरीच गळफास लावून जीवन संपवले. ही घटना सोमवार दिनांक 7 ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. A 55-year-old man from Nandepera hanged himself at his home.

गणपत जयराम वांढरे (55) असे मृतकाचे नाव आहे ते नांदेपेरा येथे वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी त्यांची मुले शिक्षणानिमित्य बाहेर गेली होती तर पत्नी शेतात गेली होती. ते घरी एकटेच होते, त्यांनी त्याच वेळी सकाळी 9 वाजताच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी अखेर गळफास घेत जीवन संपवले.

ही बाब लक्षात येताच पोलिसांना सूचित करण्यात आले, या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आणि मोठा आप्त स्वकीय परिवार आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009