● अवैद्य धंद्यात लिप्त पोलिसांवर कारवाई
● पोलीस अधीक्षक एक्शनमोड मध्ये
Police News | पोलीस अधीक्षक एक्शनमोड वर आले आहेत. तत्कालीन ठाणेदारांच्या कार्यकाळात पोलिसिंग नाहीशी झालेल्या वणी ठाण्यावर कारवाईचा बडगा पोलीस अधीक्षकांनी उगारला आहे. धमकी, अवैद्य धंद्यात लिप्त पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून डिव्हिजन च्या बाहेर फेकण्यात आले आहे. Action has been taken against the police involved in illegal business.
वणी पोलीस ठाण्यात मागील काही महिन्यात प्रचंड अनागोंदी माजली होती. डीबी पथक आपल्या पद्धतीने कामकाज करत होते. त्याप्रमाणेच अवैद्य धंद्यात सहभाग नोंदवत मनमानी, मारहाण, धमकी आणि मिळेल तिथे “तोडपाणी” करत असल्याची चर्चा शहरात रंगायला लागली होती. त्यातच शिवसेना शहर प्रमुख ललित लांजेवार यांचा मृत्यू डीबी पथकातील हवालदाराने दिलेल्या धमकी मुळे झाल्याचा आरोप स्वतः मृतकाच्या पत्नीने केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
वणी पोलीस ठाण्यातील डीबी पथकात कार्यरत पोलिसांनी खुलेआम मनमानी चालवली होती. रेती तस्करी सोबतच सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तत्कालीन ठाणेदारांचा वाचक नसल्याने बेलगाम झालेल्या पोलिसांनी चक्क पोलीस प्रशासनाची प्रतिमाच डागाळली. अखेर त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. हे पुरेसे नसून त्यांचे निलंबन करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती.
वणी पोलीस ठाण्यात महत्वपूर्ण असलेल्या डीबी पथकात कार्यरत विकास धडसे, शुभम सोनूले, सागर सीडाम यांची पुसद व दारव्हा डिव्हिजन मध्ये बदली करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. तत्पूर्वी या तिघांनी रजा घेतल्याचे कळत आहे. पोलीस अधीक्षकांनी त्यांचेवर रेती तस्करी बाबत कारवाई केल्याची माहिती आहे.
Rokhthok News






