Home Breaking News accident : अपघातात 35 वर्षीय व्‍यक्‍तीचा मृत्‍यू

accident : अपघातात 35 वर्षीय व्‍यक्‍तीचा मृत्‍यू

● कुर्ली शिवारातील घटना

3146
Image Search 1699448541543

कुर्ली शिवारातील घटना

Sad News Wani | तालुक्‍यातील महामार्गावर भरधाव वेगात वाहने हाकण्‍याची स्‍पर्धा लागली की काय असे वाटायला लागले आहे. आपल्‍या दुचाकीने मामाच्‍या गावाला जात असलेल्‍या 35 वर्षीय व्‍यक्‍तींचे दुचाकीवरील नियंञण सुटले आणि रस्‍त्‍याच्‍या कडेला दुचाकी आदळली. या अपघातात त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना बुधवार दिनांक 8 नोव्‍हेंबरला सकाळी 9ः30 वाजता घडली. The bike hit the side of the road and He died in this accident

Img 20250422 wa0027

गजानन अशोक पारखी (35) असे मृतकांचे नांव आहे तो शास्‍ञीनगर वणी येथील निवासी होता. घटनेच्‍या दिवशी त्‍याचे मामा लक्ष्‍मण महादेव बल्‍की राहणार शिवनी यांचे सोबत दुचाकी क्रमांक MH 29 AZ 8893 ने शिवनीला जायला निघाले.

Img 20250103 Wa0009

महामार्गावरुन जात असतांना कुर्ली शिवारात विरुध्‍द दिशेने येणारा ट्रक आपल्‍या वाहनांवर येत असल्‍याचे समजून गजानन याने दुचाकी रस्‍त्‍याच्‍या कडेला खाली उतरवली आणि त्‍यांचे दुचाकीवरील नियंञण सुटले. यामुळे दोघेही दुचाकीसह खाली पडले यावेळी रस्त्‍यावरील दगड मृतकांच्‍या डोक्‍याला लागला.

स्‍थानिकांनी जखमीला तातडीने वणी ग्रामीण रुग्‍णांलयात हलवले डॉक्टरांनी गजानन ची तपासणी करून त्याला मृत्यू घोषित केले. शव विच्‍छेदन नंतर त्‍याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास शिरपुर पोलिस करत आहे.
Rokhthok News