● आत्महत्येचे कारण अस्पष्ट
suicide news | जञा मैदान परिसरात असलेल्या आपल्या फर्निचरच्या दुकानातच 22 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार दि. 12 जुलैला सकाळी उजागर झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी धडकले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. A 21-year-old youth committed suicide by hanging himself in his furniture shop.

रोशन दिगांबर बावणे (22) असे मृतकांचे नांव आहे. तो लालगुडा येथील निवासी असुन त्यांचे जञा मैदान परिसरात फर्निचरचे दुकान आहे. दुकानात फर्निचर साहित्य मोठया प्रमाणात असल्याने तो दुकानातच झोपत होता. घटनेच्या दिवशी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली.
यावेळी प्रत्यक्षदर्शीनी ही माहिती घरच्या मंडळीना कळवली तसेच पोलीसांना सुचित करण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णांलयात पाठवला आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होवू शकले नाही पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News