Home Breaking News विषाचा घोट, त्याने …मृत्यूला कवटाळले

विषाचा घोट, त्याने …मृत्यूला कवटाळले

● बाबापूर गावात पसरली शोककळा

1355
C1 20231123 11544129

बाबापूर गावात पसरली शोककळा

SAD NEWS WANI | आर्थिक विवंचना आणि अस्मानी संकट यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. तालुक्यातील बाबापूर येथील 45 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या शेतात विषाचा घोट पोटात रिचवत मृत्यूला कवटाळले. ही दुःखद घटना बुधवार दिनांक 22 नोव्हेंबरला उघडकीस आली. A farmer’s son died in his field by swallowing poison in his stomach.

Img 20250422 wa0027

प्रशांत अण्णाजी निब्रड (45) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह बाबापूर येथे वास्तव्यास होता. वडिलांच्या नावे असलेलली शेती तो कसायचा. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो शेतात गेला होता. बराच वेळ लोटला तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता प्रशांतचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

Img 20250103 Wa0009

पारिवारिक मंडळींनी पोलिसांना सूचित केले, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा आप्तस्वकीय परिवार आहे. त्याच्या मृत्यूने बाबापूर गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
Rokhthok News

Previous articleगणपती बोढे यांचे 101 व्या वर्षी निधन
Next articleआणि… त्याने घरातच घेतला गळफास
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.