
● तीन दिवसांपूर्वी केले होते विष प्राशन
Sad News :
वणी तालुक्यातील डोंगरगाव येथे हृदयद्रावक घटना घडली. सुहास हिंगाने (45) या शेतकरी युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तीन दिवस खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही तो मृत्यूशी झुंज हरला आणि 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Despite being treated in a private hospital for three days, he lost his battle with death.
सुहास हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्याकडे तीन एकर शेती व ट्रॅक्टर होता. घटनेच्या दिवशी त्याने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब कुटुंबियांना कळताच त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली अखेर सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्तपरिवार दुःखसागरात बुडाला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Rokhthok