● अंत:करण पिळवटणारी घटना
● गर्भवती मातेने घेतला टोकाचा निर्णय
Sad News :
मंगळवारी सकाळी लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्ही गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गर्भवती मातेने आपल्या दोन वर्षीय मुलीला दुपट्ट्याच्या साह्याने स्वतःच्या पोटाला बांधले आणि विहिरीत उडी मारली. या घटनेत गर्भवती मातेसह लेकीचा मृत्यू झाला. अंत:करण पिळवटणाऱ्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. Heartbreaking: Mother jumps into well with daughter tied to her stomach
पूजा मोहन नेमाने (25) व नव्या (02) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. या मायलेकीच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक 12 ऑगस्टला दुपारी 11 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घटना घडताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेत मायलेकींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र घरगुती कलहातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवरा, सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून समाजमन सुन्न झाले आहे.
ROKHTHOK






