Home Breaking News Helicopter accident : जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू

Helicopter accident : जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू

● राजकुमार, पत्नी श्रद्धा व काशी या बालिकेचा समावेश... ● शहरावर पसरली शोककळा

2146
C1 20250615 11025595

राजकुमार, पत्नी श्रद्धा व काशी या बालिकेचा समावेश…
शहरावर पसरली शोककळा

Sad News : केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले. या भीषण घटनेत वणी येथील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला अशी माहिती आहे. ही घटना रविवारी पहाटे 5:20 वाजता घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. Helicopter accident: Jaiswal couple and their little girl die

हेलिकॉप्टर अपघातात राजकुमार सुरेश जायसवाल (41), श्रद्धा राजकुमार जयस्वाल (32) व काशी राजकुमार जयस्वाल या दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. हे सर्व वणी येथील निवासी होते. राजा जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी शहरात भव्य “काशी शिव महापुराण” चे आयोजन केले होते. तेव्हापासून जयस्वाल परिवार प्रकाशझोतात आला होता.

Img 20250103 Wa0009

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला गेले होते. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते. या अपघातात पायलटसह सर्व 7 प्रवाशांचा मृत्यू झाला यात दोन वर्षीय काशी जयस्वाल हिचा समावेश आहे.
Rokhthok News