● वणी- यवतमाळ महामार्गावरील घटना
Accident News :
मारेगाववरून काम आटोपून आपल्या गावी परतत असताना एका दुचाकीस्वाराची उभ्या ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज शनिवार दिनांक 9 ऑगस्टला सायंकाळी साडेसातच्या सुमारास वणी-यवतमाळ महामार्गावरील बुरांडा (ख) गावाजवळ घडली. Horrible…..A bike collided with a stationary truck, the bike rider was seriously injured
नारायण दौलत मुंगोले (55) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी ते हटवांजरीहून मारेगावला शेतीपयोगी साहित्य आणण्यासाठी गेले होते. गावाकडे परतताना त्यांच्या दुचाकी क्रमांक MH-29-AC-4215 ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-26-AD-0299 ला मागून धडक दिली.
अपघात घडताच स्थानिकांनी जखमी झालेल्या मुंगोले यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलिस करताहेत.
ROKHTHOK






