Home Breaking News खबरदार….विद्यार्थ्यांना ञास होत असेल तर..!

खबरदार….विद्यार्थ्यांना ञास होत असेल तर..!

● इरशाद खान आगार प्रमुखांवर बरसले

इरशाद खान आगार प्रमुखांवर बरसले

MNS Wani News | शालेय विद्यार्थ्यांना बस अभावी शिक्षणाला मुकावं लागत असेल तर ते खपवून घेतल्‍या जाणार नाही असा निर्धार करत वाहतुक सेनेचे राज्‍य उपाध्‍यक्ष इरशाद खान यांनी येथील आगार प्रमुखांना चांगलेच खडे बोल सुनावले. तात्‍काळ बसफेरी सुरु करावी अन्‍यथा गाठ मनसेशी असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. Be careful… if the students are getting sick…!

शिक्षणासाठी वाट्टेल तो ञास सहन करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी हताश झाले असतील तर… अखेरचा पर्याय मनसे. तालुक्‍यातील मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथील विद्यार्थ्यांनी थेट-भेट घेतली मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांची. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज्‍य मार्ग परिवहन विभागाच्‍या वणी आगारात धडकले.

आगार व्यवस्थापकाची भेट घेत त्‍यांनी महामंडळाचा अनागोंदी प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही असे स्‍पष्‍ट केले. तसेच मनसे नेते राजु उंबरकर यांच्या सहकार्याने एसटी महामंडळाचा कारभारच हाती घेण्यास मनसे सक्षम असल्‍याची तंबी यावेळी इरशाद खान यांनी आगार प्रमुखांना दिली.

Img 20250103 Wa0009

मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर ये-जा करण्‍यास बस उपलब्ध नसल्याने पालक चिंताग्रस्‍त झाले होते. सरपंच व ग्रामपंचायत सदस्‍य यांचेसह विद्यार्थ्यांनी आपली कैफियत इरशाद खान यांना सांगीतली होती. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी आगार प्रमुखांना अवगत करत तातडीने निर्णय घेण्‍याचे सुचविले.

आगार प्रमुखाने आश्‍वस्‍त करत बसफेऱ्या सुरु करण्‍यात येईल असे सांगीतले. याप्रसंगी मनसे वाहतूक सेनेचे वणी विधानसभा अध्यक्ष शम्स सिद्दीकी, मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मनसे शहर अध्यक्ष शिवराज पेचे,  मनसे वाहतूक सेनेचे शहर उपाध्यक्ष अयाज पठाण, लकी सोमकूवर व मनसे वाहतूक सेनेचे समस्त कार्यकर्ते  व मोठया संख्‍येने विद्यार्थी उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS