Home Breaking News आणि…संजय खाडे हेच छटपूजेला उपस्थित

आणि…संजय खाडे हेच छटपूजेला उपस्थित

● उत्तर भारतीय मतदारांचा जिंकला विश्वास

20241112 210853

उत्तर भारतीय मतदारांचा जिंकला विश्वास

Politial News | उत्तर भारतीयांचा सर्वात महत्वाचा सण छटपूजा म्हणजेच प्रकाशपर्व. उत्तर भारतीय समाज बांधवाने दिनांक 5 ते 8 नोव्हेंबरला येथील राजूर कॉलरी येथे हा महत्वपूर्ण सण उत्साहात साजरा केला. छटपूजेला अपक्ष उमेदवार संजय खाडे व माजी आमदार विश्वास नांदेकर यांची उपस्थिती होती. निवडणुकीच्या धामधुमीत मोठया उत्सवात सहभागी झाल्याने त्यांनी उत्तर भारतीय मतदारांचा “विश्वास” जिंकला. Independent candidate Sanjay Khade and former MLA Vishwas Nandekar attended the Chhat Puja

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा सण साजरा केला जातो. छठ पूजेच्या दिवशी सूर्यदेव आणि षष्ठी मैया यांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी महादेवाची देखील पूजा केली जाते. छठ पूजा वर्षातून दोनदा साजरी केली जाते. एक चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात.

देशाच्या अनेक भागामध्ये छट पूजा साजरी होत आहे. हा सण मैथिल, माघी आणि भोजपुरी लोकांचा सर्वात मोठा सण आहे असे म्हणतात. ही त्यांची संस्कृती आहे लोककथेनुसार सीता आणि राम दोघेही सूर्यदेवाची पूजा करत असत. हे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात होते. वनवासातून परतल्यानंतर त्यांनी हे केले. तेव्हापासून छठ पूजा हा एक महत्त्वाचा हिंदू सण बनला आहे आणि दरवर्षी त्याच विश्वासाने साजरा केला जातो.

Img 20250103 Wa0009

छटपूजेच्या पावनपर्वावर संजय खाडे यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. निवडणुकीच्या महत्वपूर्ण कालावधीत त्यांनी उत्तर भारतीय बांधवांच्या उत्सवाला उपस्थिती दर्शवली यामुळे समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे दिसून येत आहे. याप्रसंगी मनोज दुबे, शंभू राय, संजय सिंग, महेश गुप्ता, गजानन यादव, अवढेश प्रसाद, चंदू सिंग, बादल यादव, भीम यादव, नारद राम, श्रीवास्तव, मोहन यादव, जितेंद्र सिंग, शंकर सिंग, सुधीर सिंग, अरबाज खान, थॉमस कुंबलवार हे समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS