Home Breaking News त्‍या…अधिकाऱ्यांचे नक्षलवाद्यांकडून अपहरण….!

त्‍या…अधिकाऱ्यांचे नक्षलवाद्यांकडून अपहरण….!

● मनसे नेत्‍यांची पोलीसांत तक्रार

1569

मनसे नेत्‍यांची पोलीसांत तक्रार

Wani News | वणी उपविभागात काय घडेल हे सांगता येत नाही. अनेक विभागाचे अधिकारी आपल्‍या मुख्‍यालयात उपस्थित राहत नसल्‍याची बाब समोर आली आहे. त्‍या अधिकाऱ्यांचे नक्षलवाद्यांकडून अपहरण तर केले नाही ना अशी शंका उपस्थित करत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी पोलीसात तक्रार केली आहे. It has come to light that many officers of the department are not present at the headquarters.

Img 20250422 wa0027

मनसे नेते राजु उंबरकरांनी पोलीसात दिलेल्‍या तक्रारीत गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. SDO, तहसिलदार, पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी, SDPO व त्यांचे अधिनस्‍त अधिकारी, कर्मचारी एवढेच मुख्‍यालयी हजर आहेत तर अन्‍य महत्‍वपुर्ण विभागाचे  अधिकारी बेपत्‍ता असल्‍याचा दावा तक्रारीतुन करण्‍यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

मनसे नेते उंबरकर यांनी स्‍वतः अनेक कार्यालयात पाहणी केली असता बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग वरिष्ठ अधिकारी,  तालुका क्रीडा अधिकारी, भुमि अभिलेख वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, दारुबंदी वरिष्ठ अधिकारी मुख्‍यालयी उपस्थित नव्‍हते तर त्‍यांच्‍या कार्यक्षेञात आढळले नाहीत. यामुळे त्‍यांचे नक्षलवाद्यांकडून अपहरण तर केले नाही ना अशी शंका व भिती तक्रारीतुन व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

उंबरकरांनी उपस्थित केलेली बाब अतिशय गंभीर आहे. अनेक विभागाचे अधिकारी मुख्‍यालयी हजर राहत नसल्‍याने सर्व सामान्‍य नागरीकांना नाहक ञास सहन करावा लागतो. सरकार “शासन आपल्‍या दारी” हा उपक्रम राबवत असताना मात्र अधिकारी मनमानी पध्‍दतीने वागत असल्‍याचे वास्‍तव अधोरेखित होतांना दिसत आहे. उंबरकरांनी दिलेल्‍या तक्रारीत त्‍या अधिकाऱ्यांचे अपहरण तर केले नाही ना अशी शंका उपस्थित केली असुन पोलीसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Rokhthok News