Home Breaking News LCB ची कारवाई, मुंबईतून यवतमाळात ड्रग्ज ‘तस्करी’

LCB ची कारवाई, मुंबईतून यवतमाळात ड्रग्ज ‘तस्करी’

एक लाख 18 हजाराचे एमडी ड्रग्ज जप्त
पोलिसांच्या निशाण्यावर ‘ते’ ड्रग्ज शौकिन

रोखठोक– यवतमाळ | जिल्ह्यातील ड्रग्ज शौकिन महागड्या एमडी (Synthetic Drugs) ची नशा करतात हे नव्याने उजागर झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने (LCB) मुंबईतून महागडे ड्रग्ज आणणाऱ्या आरोपीला बुधवार दि.15 फेब्रुवारी ला सकाळी शिताफीने ताब्यात घेतले.

रहीम खान कुद्दूस खान (50) मोसीन ले-आऊट डोर्ली रोड यवतमाळ असे अटकेतील व्यक्तीचे नाव असून तो सध्यस्थीतीत मुंबईतील अंधेरी उपनगरात ( In Andheri suburb of Mumbai) गावदेव डोंगार परिसरात वास्तव्यास आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने (LCB) त्याला यवतमाळातील डोर्ली शिवारातून ताब्यात घेतले आहे.

मुंबईतून महागडे एमडी (Synthetic Drugs) जिल्ह्यातील शौकिनांना पुरवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पाळत ठेवण्यास सांगितले. LCB पथकाने सापळा रचला आणि डोर्ली बायपास परिसरातुन आरोपीला ताब्यात घेतले.

Img 20250103 Wa0009

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या एमडी (MD) ड्रग्जची खुल्या बाजारातील किमत 1 लाख 18 हजार 320 रुपये इतकी आहे. आरोपीविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाणे येथे एनडीपीएस (NDPS) कायदा कलम 8 (क), 22 (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात LCB प्रमुख प्रदीप परदेशी, API विवेक देशमुख, सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे, PSI राहुल गुहे, जमादार साजीद सय्यद, अजय डोळे, बंडू डांगे, विनोद राठोड, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी, विवेक पेठे यांनी केली.
रोखठोक : बातमीदार